। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील अनेक राज्यांना मान्सूननं दणका दिलाय.आता उत्तर भारताकडं वाटचाल होत असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. कर्नाटक, केरळ, गोवा आदी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ इथं पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलंय. मध्य महाराष्ट्रात 24 ते 26 जून, कर्नाटकात 24 ते 25 जून, गुजरातमध्ये 25 आणि 26 जूनला पाऊस पडेल. तर, दुसरीकडं बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतापर्यंत दक्षिण, नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळं 25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.







