मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहतूक बंद

| पनवेल | वार्ताहर |

अनंत चतुर्दशी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून जुना मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबई, नवी मुंबई तसेच ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे.

गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक जण गणेश उत्सवासाठी आपल्याला गावी आलेले आहेत. त्यामुळे आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. घरगुती असणाऱ्या अनेक गणपतींचे विसर्जनदेखील झाले आहे. आता गणेश उत्सवाच्या विसर्जनाची तयारीसाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरदेखील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवार दि.28 पासून शनिवार दि.29 रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. गणपती विसर्जन आणि ईद एकच दिवशी आल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Exit mobile version