। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुण्यातील पौडजवळच असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर असून ते मुंबईहून हैदराबादला जात होते. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन प्रवासी होते. त्यातील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच स्थानिकांसह पोलीसांनी घटनास्थळी हजर होऊन बचावकार्य सुरु केले.