| रायगड | प्रतिनिधी |
दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणार्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात आली असून, या नियंत्रणकक्षाचे कामकाज सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरु राहील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबईचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.
मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक इ. तपशील पुढीलप्रमाणे आहेत. हेल्पलाईनसाठी दूरध्वनी क्रमांक (022) 27893756/27881075 कार्यालयातील हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी वरिष्ठ अधीक्षक तथा प्र.सहसचिव, शुभांगी भोसले, मो.9833369330, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) छाया मेढेकर 9869489606, वरिष्ठ अधीक्षक दिलीप नांदगावकर 8779062029, वरिष्ठ अधीक्षक नयन म्हात्रे 9819806109 अंतर्गत समुपदेशक श्रीकांत शिनगारे 9869634765, मुरलीधर मारे, 7977919850/9322105618,022-27893756/27881075. बहिर्गत समुपदेशक हयाळीज बी.के.9423947266, अनिलकुमार दि. गाढे 9969038020, जाधव विकास नारायण 9867874623, विनोद पन्हाळकर,9527587789, संजय जाधव, 9657079344/9422594844, चंद्रकांत ज. मुंढे 8169699204, अशोक देवराम सरोदे 9322527076/8888830139, शैलजा मुळये 9820646115, शेख अखलाक अहमद अ. रज्जाक 9967329370, स्नेहा अजित चव्हाण 8369015013, उज्वला क. झारे 9920125827, सी. स्मिता शिपुरकर 9819016270.