| कोलाड | वार्ताहर |
गोवे आदिवासीवाडी येथे झालेल्या पूरपरिस्थितीमुळे लोकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, दि.23 जुलै रोजी सेंटर फॉर सोशल अॅक्शनचे स्टाफ व जीवनधारा संस्थेचे स्टाफ यांनी गोवे आदिवासी वाडी येथे भेट दिली. त्यानंतर लोकांसोबत पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली, तसेच सेंटर फॉर सोशल अॅक्शन व जीवनधारा यांच्यामार्फत त्यांना आधार देण्यात आला व दि.31 जुलै रोजी गोवे आदिवासीवाडी येथे जीवनधारा संस्था व सेंटर फॉर सोशल अॅक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी वाडी येथे पूरग्रस्त 25 कुटुंबांना 1 ताडपत्री, 1 चटई, 2 ब्लँकेट, रेशनिंग किट आदींचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सेंटर फॉर सोशल अॅक्शनचे स्टाफ विलास आठवले, जीवनधारा संस्थेच्या संचालिका हिल्डा फर्नांडिस, सुरेखा माल्या, मिनोती करकरे, सुरेखा गुजर व स्टाफ तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे पीएसआय भोसकर, हवालदार मंगेश पाटील, महाडिक, ग्रुप ग्रा. गोवे येथील सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच सुमित गायकवाड, सदस्य नितीन जाधव, सदस्य नरेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत करून सर्वांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. शेवटीच गोवेवाडीतील महिला राणी अरविंद पवार हिने व गोवेवाडीतील ग्रामस्थांनी सेंटर फॉर सोशल अॅक्शन व जीवनधारा संस्था कोलाड यांचे आभार मानले.