मित्र संस्थेचा मदतीचा हात

। तळा । वृत्तसंस्था ।

कृषी दिनाचे औचित्य साधुन श्री रविप्रभा मित्र संस्था व रिलेशन रिअलटेक प्रा.लि.कं. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तळा आणि म्हसळा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करण्यात आले. यामध्ये तळा तालुक्यातील वाशी हवेली, मजगाव ताम्हाणे तसेच म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा निगडी, खारगाव (बु.) या राजिप शाळांचा व अंगणवाडींचा समावेश होता. तसेच शालेय परिसरात वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, म्हसळा गट विकास अधिकारी एम. के. जाधव, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे, रविंद्र लाड, दिपक ठाकुर, मदन वाजे, गणेश वाजे, जगन्नाथ तांडेल, पांडुरंग बने, पांडुरंग सुतार, अजय मोहिते, मिलिंद मोरे, जाधव सर, अनंत नाक्ती, हेमंत नाक्ती, नरेश विचारे, संतोष उध्दरकर, सुशांत लाड, समीर लांजेकर, किशोर गुलगुले, शांताराम निंबरे, शंकर कासार, सुजित काते, अमन भाई, तसेच चारही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

Exit mobile version