। नेरळ । प्रतिनिधी ।
लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील किरवली, शेलू येथे विद्यार्थ्यार्ंना मदत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या अंतर्गत आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पातर्फे स्टर्लिंग अँड विल्सन यांच्या माध्यमातून कर्जत विभागातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गौरकामत, जांभिवली या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाचर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून पेण आणि विद्यार्थ्यांनी बनविलेले देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांना टाईम टेबल आणि व्हिजन बोर्डचे महत्व पटवून देण्यात आली. सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक कार्यक्रम कांचन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेच्या सहाय्यक प्रकल्प समन्वयक प्रिया सोनावळे आणि ओमकार माध्यमिक (शेलू) आणि काळभैरव माध्यमिक (किरवली) या शाळेच्या सहाय्यक प्रकल्प समन्वयक शिल्पा रांगणेकर यांच्या मार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद किरंगे हे अध्यक्षस्थानी तर भूपेंद्र महाजन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.







