पितृछत्र हरपलेले विद्यार्थ्यांना मदत

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड तालुका रहिवासी सेवा, ठाणे या संस्थेच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत शैक्षणिक आर्थिक मदत वितरण (पितृछत्र हरपलेला विद्यार्थी) आणि सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी दि. 13 ऑगस्ट रोजी सायकाळी 5.00 वा. सहयोग मंदिर घंटाळी, ठाणे येथे करण्यात येत आहे. तरी सुधागड तालुका आणि ठाणे शहरातील तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.

कार्यक्रमात चंद्रशेखर श्रीधर लिमये, मधुकर मेश्राम हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शना करणार आहेत. तसेच यावेळी सुधागड जीवन गौरव, सुधागड आदर्श शेतकरी, सुधागड युवा उद्योजक, सुधागड मित्र आदी विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. सुधागड तालुका आणि ठाणे शहरातील तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.

Exit mobile version