विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीर

। पनवेल । प्रतिनिधी ।

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग आणि के.व्ही.कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चेरी ब्लॉसम’ या प्रकल्पांतर्गत शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे आरोग्य विषयक शिबीर घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल शाळा कमिटी चेअरमन म्हणून प्रीतम म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, शाळेच्या विद्यार्थिनींची आरोग्य विषयक काळजी घेताना अशा प्रकारे भविष्यातही आरोग्य विषयक शिबीर आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. यावेळी डॉ. गिरीश गुणे, डॉ. अमोद दिवेकर, डॉ. हितेन शहा व पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते.

Exit mobile version