| पनवेल | वार्ताहर |
दोन इसम बेकायदा हेरॉइन घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ते टी पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. सतनाम सिंग सुखदेव सिंग (31), सुखविंदर सिंग मुकनार सिंग (59) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून 35 ग्रॅम वजनाचे हेरॉइन पोलिसांनी जप्त केले आहे. पंजाब येथून हेरॉइन घेऊन जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांनाही हेरॉइनसह ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अभिजित अभंग, उपनिरीक्षक हजरत पठाण, प्रवीण मेथे, रवींद्र पारधी, साईन मोकल, शशिकांत काकडे यांच्या पथकाने कारवाई केली.







