हेटवणेच्या फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

मुंबईचे पाणी आज सुरू होणार
| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणारी सिडकोची फुटलेली पाईपलाईन जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई,मुंबईचा पाणीपुरवठा सोमवारी पूर्ववत सुरु होणार आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यानंतर एकच हाहाकार उडाला होता. यामध्य लाखो लिटर लाखो लिटर पाणी भात शेतीत शिरल्याने शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेल, उरण सह नविमुंबई गेली दोन दिवस तहानलेली आहे. या बाबत सदर पाईपलाईन संदर्भात सिडको प्राधिकीकरणाचे केअर टेकर रवींद्र पाटील (वाहाल) यांनी दोन दिवस फुटलेल्या पाईपलाईनीचा काम युध्द पातळीवर सुरू आहे. काही प्रमाणात या कामामध्ये अडथळे आले. परंतु ते दूर करत हे पूर्ण काम मध्यरात्रीपर्यत पूर्ण होऊन सोमवारी पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल.अशी माहिती कृषीवलशी बोलताना दिली.

पाईपलाईन फुटल्याची खबर स्थानिक नागरिक व पत्रकारांनी हेटवणे प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस.बी.जाधव व सहाय्यक अभियंता आकाश ठोंबरे यांना दूरध्वनी वरून कळवली. संबंधित अधिकार्‍यांनी ताबडतोब पाईपलाईन चा पाणीपुरवठा बंद केला व सिडको प्रशासनाच्या अधिकार्‍यांना या संदर्भात कळविले. सिडकोच्या अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन शनिवारी सकाळी पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून याठीकाणी सिडकोचे केअर टेकर रवींद्र पाटील हे कामावर लक्ष ठेऊन होते.. घटनास्थळी एक जेसीबी, एक पोकलॅन, जनरेटर व्हॅन, वेल्डींग मशीन, व छोटया तिन पाणी काढण्याच्या मशीनी, गॅस सिलेंडर, गॅस कटर, अदी सामग्रीच्या सहाय्याने काम युध्दपातलीवर सुरू आहे. कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार के.ए.तडवी घटनास्थळी उपस्थित होते.

Exit mobile version