नवाब मलिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच ईडीनं अटक केली असून सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीनं आपल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असून आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. या याचिकेसंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नेमका आरोप काय आहे?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Exit mobile version