| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात ललीत पाटील मित्र मंडळाचा गेली दोन दक्षके भरघोस बक्षिस लावून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदा या मित्र मंडळाच्या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. नियमांचे काटेकोर पालन करून ललीत पाटील मित्र मंडळाने शेवटी चार गोविंदा पथकांमध्ये बक्षिसांची रक्कम विभागून दिली. तर, वैकुंठ पाटील मित्र मंडळाने ग्रामिण गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने हमरापूर, वाशी नाका, वडखळ या तीन ठिकाणी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हमरापूर येथे विठाई खारपाले यांनी मानाचा हंडीच्या मान पटकला. तर, वाशी नाका येथे रुद्रावतार गोविंद पथक म्हैसबाड खारपाले, जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी, विठाबाई गोविंदा पथक खारपाले, श्री राम गडब माचेला, नवेगाव या पाच गोविंदा पथकाने सात थरांची सलामी देउन स्पर्धेत चुरस निर्माण केली होती शेवटी आयोजकांनी पाचही जणांना बक्षिस विभागून दिले. वडखळ येथील दही हंडी जय हनुमान गोविंदा कोलेटी पथकाने पटकावला.







