हायमास्ट खांबाला वेलींचा विळखा

महावितरण, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
कोर्लई | वार्ताहर |
गेल्या काही दिवसांपासून मुरुड तालुक्यातील बोर्ली स्थानकावरील हायमास्ट दिवे व विजेच्या खांबाला वेलींचा विळखा असून, याकडे संबंधित महावितरण व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर एसटी स्थानक परिसरात असलेल्या व सुरई-बोर्ली गावात जाणार्‍या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हायमास्ट दिवे व विजेच्या खांबाला असलेल्या वेलींच्या विळख्यामुळे वेळप्रसंगी केव्हाही विजेचा शॉक लागून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरण कंपनी व संबंधित ग्रामपंचायतीने यात लक्ष पुरवून बोर्ली स्थानकावरील हायमास्ट दिवे व विजेच्या खांबाला असलेल्या वेलींचा विळखा हटविण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

Exit mobile version