महाबँकेच्यावतीने हिंदी दिवस उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |
बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या नवी मुबई झोन व विज्ञान असोसिएशन, सी.के.टी. महाविद्यालय, नवीन पनवेल येथे विद्यार्थ्यांसाठी तात्काळ भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेत मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी बँकेच्या महाप्रबंधक व झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर, उपझोनल मॅनेजर सौरभ सिंग, प्राचार्य, डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. गणेश साठे.डॉ. अनुप्रिता वाठारकर व बँकेचे अरविंद मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय पाटील ,अपर्णा जोगळेकर ,सौरभ सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. बँके तर्फे 5 विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम पुरस्कार स्वर्णभ आंबर्स्ट, द्वितीय पुरस्कार कनिष्का गायकवाड, तृतीय पुरस्कार आर्य सिंग, प्रोत्साहन पुरस्कार चैतन्य संजय गोडसे व हर्ष नळगीकरकर यांनी पटकाविला. त्यांनी मूल्यो का महत्व, संघर्ष का महत्व, ऋण, एक दिन बैंक में, विज्ञान का अविष्कार या विषयावर आपले विचार मांडले. प्रा.डॉ. नीलिमा मोरे.बिजली दडपे यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले. संशोधन कार्यात सीकेटी महाविद्यालयाने नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल बँकेच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.

Exit mobile version