हिरु सोनावळ यांचे निधन

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हिरु जानू सोनावळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कर्जत पंचायत समितीचे सभापती म्हणून पाच वर्षे काम केले होते. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले हीरु सोनावळे यांना 1979 मध्ये सभापती पदाची संधी मिळाली. तब्बल पाच वर्षे कर्जत पंचायत समितीमध्ये सभापती पदावर कार्य केले होते आणि निष्कलंक कार्यकर्ते आणि सभापती अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. वयाच्या 90व्य वर्षी हिरू सोनावळे यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्‍चात पाच मुले दोन सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Exit mobile version