। उरण । विठ्ठल ममताबादे ।
उरणमधील पिरवाडी समुद्र किनारी दर्गाच्या पाठीमागे करंजा येथील हितेंद्र राजेंद्र म्हात्रे (वय 31) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजेंद्र म्हात्रे (रा. साईनगर, द्रोणागिरी हायस्कूलच्या बाजूला) हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटूंबियांनी दिली होती. त्याप्रमाणे पोलीस तपास सुरु होता. तपासाअंती उरण समुद्रकिनारी दर्गाच्या पाठीमागे मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह हितेंद्र म्हात्रे यांचेच असल्याचे पोलिसांनी खात्री केली.
मृत व्यक्ती हितेंद्र राजेंद्र म्हात्रे हे पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. त्यांनी आत्महत्त्या केली कि, घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.







