लोककलेतून ‘एचआयव्ही’ जागृती; डॉ. सुहास माने यांची माहिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांचे आदेशानुसार जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण रायगड लोककलेच्या माध्यमातून एचआयव्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे दि. 22 ते 24 दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपली एचआयव्ही तपासणी करून घेण्यात यावी, असे आवाहन डॉ. माने यांनी केले.

रायगड जिल्ह्यातील प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग संस्था प्रमुख तपस्वी यांच्या माध्यमातून आंबेडकर पुतळा, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, रिक्षा स्टॅन्ड बोर्ली, जेएसडब्ल्यू पेण (वडखळ), मांडवा जेट्टी या ठिकाणी तसेच स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था-रोहा संस्था प्रमुख सुचिता साळवी यांच्या माध्यमातून एसटी स्टँड रोहा, एलएनटी कॉलनी, नागोठणे, पाली, एसटी स्टँड माणगाव, लोणेरे फाटा या ठिकाणी तर कलारंग सांस्कृतिक सामाजिक नारंगी, अलिबाग संस्था प्रमुख प्रकल्प वाणी यांच्या माध्यमातून यांच्यामार्फत मोहोपाडा, कर्जत रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड उरण, एसटी स्टँड पनवेल, चिडूकपाडा कळंबोली या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत असलेले समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था पेण, लोकपरिषद संस्था पनवेल, आधार ट्रस्ट पनवेल, सक्षम संस्था रोहा, परिवर्तन संस्था पनवेल यांची मदत घेण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागचे कलावंत सार्थक गायकवाड, प्रगती कासार, पार्थ म्हात्रे, श्रुती नाईक, राज पाटील, यश म्हात्रे, स्वरांगी मोहरे यांनी तसेच स्वयंसिद्धा सामाजिक संस्था, रोहा व कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था, नारंगी, अलिबाग यातील कलाकारांनी परिश्रम घेतले आहेत.

या पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही एड्स म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, समज गैरसमज, 2017 कायदा आयसीटीसी, टोल फ्री क्र. 1097, NACO APP याविषयी प्रथम लोकगीतांच्या माध्यमातून पटवून देण्यात येणार आहे. एचआयव्हीची संसर्ग होण्याचे महत्त्वाचे चार मार्ग. यामध्ये एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, वारंवार एचआयव्ही संसर्गित व्यक्तीची तिच ती सुई व सिरिंजचा वापर केल्याने, एचआयव्ही संसर्गित रक्त दिले गेल्यास व एचआयव्ही संसर्गित पालकांकडून होणार्‍या बाळाला एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो. याकरिता प्रत्येक नागरिकांनी तसेच गरोदर मातांनी सरकारी दवाखान्यातील (ICTC) समुपदेशन व तपासणी केंद्रातून आपली एचआयव्हीची तपासणी घेणे आवश्यक आहे. तसेच नेहमी नवीन सुईचा वापर करणे, रक्ताची अत्यंत आवश्यकता भासल्यास प्रमाणित रक्तपेढीतून रक्त घेणे, तसेच एचआयव्ही संसर्गित आठळल्यास मोफत औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती देऊन पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

Exit mobile version