सुदैवाने घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
| खास प्रतिनिधी | रायगड |
पाली-खोपोली राज्य महामार्गावर उंबरे गावाजवळ शनिवारी (दि. 3) एक भले मोठे होर्डिंग कोसळले आहे. दरम्यान, या मार्गावरुन कोणतेही वाहन अथवा पादचारी जात नव्हता, त्यामुळे सुदैवाने तेथे कोणतीच अप्रिय घटना घडली नाही. मात्र, या घटनेने घाटकोपरच्या घटनेची आठवण झाली.
लोखंडी अवजड होर्डिंग जेथे पडले. त्यावेळी तेथे एखादे वाहन किंवा पदाचारी जात असते मोठी दुर्घटना घडली असती. होर्डिंग लावण्यासाठी संबंधित जाहिरातदाराने एमएसआरडीसीची परवानगी घेतली होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. महामार्गांवर असणार्या सर्व होर्डिंगची चौकशी करुन ते अनधिकृत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.