| पुणे । प्रतिनिधि |
दोन दिवसांत दुसरा विजय नोंदवत गतविजेता हॉकी मध्य प्रदेश संघ हा 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे गुरुवारी मध्य प्रदेशने हॉकी बिहारला 7-1 असे मागे टाकत ए गटातून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहेत. दरम्यान, हॉकी झारखंड (4 गुण; 2 सामने) संघ सी गटातून पात्रतेच्या जवळ पोहोचला. हॉकी बंगालने तामिळनाडूच्या हॉकी युनिटवर 2-0 असा विजय मिळवताना एच ग्रूपमधून आगेकूच कायम ठेवली आहे. तेलंगणा हॉकी संघाने पूल-एच मध्ये हॉकी गुजरातला 12-0 ने पराभूत केले. हॉकी मणिपूरने दादरा आणि नगर हवेलीला पूल-जीमध्ये त्याच फरकाने पराभूत केले.
दिवसाची सुरुवात पूल-अ मधील सामन्याने झाली. सलग दिवस खेळणार्या हॉकी मध्य प्रदेशने हॉकी बिहारचा 7-1 असा पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. बिहार आपला पहिला सामना खेळत होता. या विजयामुळे मध्य प्रदेशचे गुणतालिकेत सहा गुण झाले. दुसर्या हाफमध्ये हृतिका सिंग (45वा, 50वा) आणि ऐश्वर्या चव्हाण (6वा), प्रीती दुबे (9वा), कांचन निधी केरकेट्टा (32वा पी.सी.), इशिका चौधरी (33व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. हॉकी झारखंडने भारतीय स्टार सलीमा टेटे (15व्या) आणि रेश्मा सोरेंग (19व्या) यांनी चांगली सुरुवात करून दिली. उत्तर प्रदेशने मुमताज खान (34व्या) आणि बानो हिना (47व्या) पेनल्टी-कॉर्नरवर बरोबरी साधली. चकमकीचा सर्वाधिक फायदा हॉकी झारखंडला झाला आणि त्यांच्या गुणांची संख्या 3 गुणांवर गेली.
पूल-एच मधील दोन पराभूत संघांच्या लढाईत तेलंगणा हॉकीने हॉकी गुजरातवर 12-0 अशी मात करताना पहिला विजय नोंदवला. पूल-एचमध्ये, हॉकी बंगालने तामिळनाडूच्या हॉकी युनिटविरुद्ध 2-0 असा प्रत्येक हाफमध्ये एकदा गोल करून त्यांचा दुसरा विजय नोंदवला. सुष्मिता गांधी (21व्या) आणि सुष्मिता पन्ना (38व्या) यांनी दुसर्या दिवशी हॉकी बंगालसाठी पूर्ण गुण मिळवले. पूल-जीमध्ये मणिपूर हॉकीने दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हॉकीचा 12-0 असा पराभव केला.