स्वच्छतादूतांच्या हातून ध्वजारोहण

शेकापकडून दुर्लक्षित घटकाचा सन्मान

| पनवेल | प्रतिनिधी |

ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे आपले स्वच्छतादूत शहराची साफसफाई करून नागरिकांना रोगराईपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. समाजापासून नेहमीची दुर्लक्षित असलेल्या या घटकाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांच्या हातून ध्वजारोहण करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पनवेल तालुक्यातील कामोठेतील सेक्टर 18 मध्ये झेंडावंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेकापच्या या कृतीची संपूर्ण कामोठेमध्ये चर्चा असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी आ. बाळाराम पाटील यांनी कामोठेमधील पदाधिकार्‍यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मा. नगरसेवक गणेश कडू, शहर अध्यक्ष अमोल शितोळे, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, पंडित गोवारी, अल्पेश माने, उषा झणझणे, नितीन पगारे, सुरेश खरात, रामचंद्र भोईर, शुभांगी खरात, सचिन झणझणे, देवेंद्र मडवी, बबन विश्‍वकर्मा रवींद्र सिंग, तुकाराम आवटी, गोविंदा बराड, नितीन अग्रवाल, श्री. मोहिते, ओ.पी. तिवारी, अभिषेक कणसे, रिचा पोरवाल, श्‍वेता अग्रवाल, शोभा हाडवळे, मिसेस कांतीवाल, जगन्नाथ चक्रपाली आदी पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version