आमदारांना होळीची भेट; स्थानिक विकासनिधी ४ वरून ५ कोटी

पीए /ड्रायव्हरच्या पगारात 5 हजाराची वाढ
। मुंबई । दिलीप जाधव ।
आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरुन पाच कोटी करण्याचा निर्णय घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना होळीची भेट दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. तर आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला आहे अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधनासभेत अर्थसंकल्पावरील चर्चेस उत्तर देताना केली .त्यावेळी सर्व आमदारांनी बाके वाजवून अर्थमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत केले .
आमदारांना स्थानिक विकासासाठी पाच कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.

निधी देताना पक्ष पहात नाही
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो.असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही, अशी माहिती अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला

Exit mobile version