राज्यातही सुट्टी जाहीर

| मुंबई | वृत्तसंस्था |

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

Exit mobile version