जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेश
| अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. रात्रभर वादळी वाऱ्यासह सुरू असलेला पाऊस व समुद्रास असणाऱ्या भरतीमुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, सुधागड, (पाली) व पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना मंगळवारी (दि .15) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या तालुक्यातील अंगणवाडी सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र अशा अनेक शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले.







