होली चाईल्ड स्कूलचे ‌‘गुणदर्शन‌’

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ‌‘प्रभाविष्कार‌’ अंतर्गत होली चाईल्ड स्टेट बोर्ड स्कूल वेश्वी शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सिने अभिनेत्री, तसेच नाटक, मराठी, हिंदी अल्बम साँगमध्ये विविध भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. जुईली टेमकर उपस्थित होत्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारचे सादरीकरण केले.


यावेळी स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रविंद्र पाटील, ॲकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, लेखापाल मनिषा रेलकर, अंकित भानुशाली, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह इतर मान्यवर, शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Exit mobile version