गृह मतदानाला अलिबाग मतदार संघापासून सुरुवात

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदार संघातील निवडणूक यंत्रणा 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांची घरोघरी जावून मतदान नोंदविण्याची प्रक्रियेला अलिबाग विधानसभा मतदार संघापासून सुरुवात झाली आहे. भारत निवडणूक विभागाने सुरु केलेल्या या सुविधेमुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे.

मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांग मतदारांच्या गृह मतदानास सुरुवात झाली असुन या मतदारसंघात 275 मतदाते आहेत, अशी माहिती अलिबाग विधानसभा संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, मुरुड तालुक्यात 42 मतदाते असल्याची माहिती मुरुड तहसिलदार-रोहन शिंदे यांनी दिली. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. गृहमतदानाला रायगड लोकसभा मतदारसंघात सुरुवात झाली. यावेळी दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला. दुसर्‍या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड 32लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तिसर्‍या 7 मे रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात येत आहे.

Exit mobile version