वृध्द व अपंग मतदारांचे गृहमतदान

| पोलादपूर | प्रतिनिधी |

महाड विधानसभा मतदार संघामध्ये वृध्द आणि अपंग मतदारांचे 12 ‘ड’ हा अर्ज भरून मतदार नोंदणी करीत गृहमतदान करण्याची यंदा नव्याने संकल्पना निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत आहे. संपूर्ण महाड विधानसभा मतदार संघामध्ये या मतदानाचा पहिल्यांदाच प्रयत्न झाला असल्याची माहिती महाड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

महाड विधानसभा मतदार संघामध्ये वृध्द मतदार 294 तर अपंग मतदार 51 असल्याची नोंद करण्यात आली. या मतदारांकडून गृह मतदानासाठी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. पोलादपूर तालुक्यामध्ये या नव्या पध्दतीचे मतदान वृध्द नागरिकांच्या घरी जाऊन गुप्तमतदान पध्दतीने होण्यासाठी तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी टीम कार्यरत राहिली. पोलादपूर तालुक्यातील ढवळे खोपड 364 आणि करंजे 365 मतदान केंद्रातील प्रत्येकी एक अशा वृध्द महिलांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेकडून गृह मतदान करून घेण्यात आले. मतमोजणीवेळी या गृहमतदानाची आकडेवारी संबंधित उमेदवारांच्या आकडेवारीमध्ये समाविष्ठ करण्यात येणार आहेत.

Exit mobile version