मा. आ. जयंत पाटील यांचा सत्कार

। वायशेत । वार्ताहर ।

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग या बँकेची 30 सप्टेंबर 1960 साली स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील मंगळवारी (दि.1) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त महाड येथील दत्त प्रा. देशमुख-कांबळे भजन मंडळाचे बुवा सुजित देशमुख व मृदंग अजित देशमुख यांच्या भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून सुजित देशमुख यांच्या हस्ते आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष मा. आ. जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बँकेचे वरीष्ठ अधिकारी वाघमोडे, भगत, नांदगांवकर, पी.के. पाटील, पडवळ, म्हात्रे, देशमुख, संतोष पाटील तसेच महिला कर्मचारी, काशिनाथ भावजी, रमाकांत म्हात्रे, अरविंद पडते, सारंग यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version