सोन्याची अंगठी केली परत
नेरळ | वार्ताहर |
कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत चारफाटा परिसरातील ठाकरे हॉटेलमध्ये शनिवारी तेथील एका वेटरला सोन्याची अंगठी सापडली. सदर अंगठी हॉटेल मालकाने कर्जत पोलीस ठाण्यात जमा केली. दरम्यान, त्या ग्राहकाने नंतर ठाकरे हॉटेलमध्ये आल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन खात्री पटवून अंगठी परत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपपान सोनावणे यांनी खात्री करून जयेश भासे यांना सोन्याची अंगठी परत केली. कर्जत पोलिसांनी ठाकरे हॉटेल मधील कामगारांचा प्रामाणिकपणाबद्दल मालक रामदास ठाकरे यांचे कौतुक केले.लॉकडाऊन काळामध्ये असा प्रामाणिकपणा अजूनही माणुसकी जिवंत आहे, याबाबत हॉटेल चालक आणि त्यांच्या नोकरवर्गाचे परिसरात कौतुक होत आहे.