पत्रकार दिनेश ठमके यांचा प्रामाणिकपणा !

18,000 चा हरवलेला मोबाईल केला परत

| सुकेळी | वार्ताहर |

आजच्या काळातही अनेकजण आपले काम हे प्रामाणिक आणि तत्परतेने करत असतात. अशाच एका कार्यतत्पर पत्रकाराने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. एका ट्रॅक्टर चालकाचा हरवलेला 18, 000 रु. किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल दिनेश मधुकर ठमके यांनी त्या ट्रॅक्टर चालकास परत केला.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी दि.13 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दिनेश हे आपल्या कामावरती जाण्यासाठी निघाले असता त्यांना वाकण पुलावरती मोबाईल पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपली दुचाकी गाडी बाजुला थांबवून तो मोबाईल आपल्या ताब्यात घेतला की जेणेकरून कोणाचा तरी फोन आल्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल परत करता येईल. काही वेळातच त्या फोनवरती त्या ट्रॅक्टर चालकाने दुस-या एका फोनवरुन फोन केला. दिनेश यांनी तात्काळ फोन उचलुन त्यांना फोन माझ्याकडे आहे. तुम्ही सुकेळी येथिल जिंदल रुग्णालयात येऊन माझ्याकडून फोन घेऊन जा. काही वेळातच ट्रॅक्टर चालक नवनाथ दामोदर तोरवे हे वाकण येथिल आकाश वर्मा यांना घेऊन जिंदाल रुग्णालयात आले. त्यावेळी दिनेश यांनी व्हिवो वाय 33 टी कंपनीचा 18,000 रु. किंमतीचा असलेला मोबाईल दामोदर यांना परत करत एक आपुलकीची भावना जपली. यावेळी दामोदर यांचा मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यावर एक वेगळेच हास्य दिसुन आले व त्यांनी दिनेश यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले. दिनेश यांच्या कर्तुत्वाबद्दल सर्व विभागातुन अभिनंदन होत आहे.

Exit mobile version