माथेरानमध्ये अश्‍वपालाचा प्रामाणिकपणा

रस्त्यात सापडलेले सोन्याचे दागिने पर

| नेरळ | प्रतिनिधी |

पर्यटनासाठी आलेल्या नवविवाहित दाम्पत्याची सोन्याची गंठण रस्त्यावर पडली होती आणि ती तीन तोळे वजनाची गंठण अश्‍वपालक याला सापडली. त्यांनी ते प्रामाणिकपणे दागिने गंठण पोलिसांच्या स्वाधीन  केले.

बदलापूर येथील गणेश भानुदास म्हसे हे पत्नीसह माथेरान येथे 3 मे रोजी आले आहेत. दस्तुरी ते माथेरान या महात्मा रस्त्यावरील वुड साईड या हॉटेलमध्ये ते नवदाम्पत्य थांबले होते. सायंकाळी पर्यटनासाठी माथेरान शहरातून फेरफटका मारून त्या वुड साईड या आपल्या हॉटेल वर परतले होते. गणेश म्हसे यांच्या पत्नीचे गळ्यात असलेली तीन तोळे वजनाची सोन्याची गंठण पडली असल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले. त्यांनी  फिरायला गेले होते तेथे जाऊन पाहणी करून आले आणि तरी देखील त्यांना सोन्याची गंठण काही सापडली नव्हती. त्यामुळे आज सकाळी त्यांनी हॉटेल व्यवस्थापक यांना भेटून गंठण हरवल्याचे नमूद केले. मात्र हॉटेल मधील त्यांची रूम आणि हॉटेलचा परिसर शोधून देखील गंठण सापडली नव्हती. त्यामुळे गणेश म्हसे यांनी माथेरान पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळी माथेरान मधील स्थानिक अश्‍वपाल संघटना कार्यकर्ता असलेला अश्‍वपाल बाळू खरात यांनी संघटनेच्या अध्यक्ष आशा कदम यांची भेट घेऊन आपल्या महात्मा गांधी रस्त्यावर सोन्याची गंठण सापडली असल्याचे सांगत ती गंठण आशा कदम यांना दाखवली. साधारण 2 लाख रुपये किमतीची सोन्याची गंठण घेऊन आशा कदम आणि बाळू खरात हे माथेरान पोलीस ठाण्यात पोहचले. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शेखर लाव्हे यांनी संबंधीचे सोन्याच्या गंठण बद्दल सोशल मीडियावर माहिती प्रसारित केली. ती गंठण कशी कुठे सापडली याबाबत अश्‍वपाल बाळू खरात यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु असताना नेमक्या त्याचवेळी ज्यांची गंठण हरवली आहे ते बदलापूर येथील गणेश म्हसे हे त्यांच्या पत्नीसह तक्रार देण्यासाठी पोहचले होते. शेवटी खात्री करून पोलीस  निरीक्षक शेखर लव्हे आणि अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्ष आशा कदम यांच्या उपस्थितीत अश्‍वपाल बाळू खरात यांनी गणेश म्हसे या दाम्पत्याला त्यांची सोन्याची गंठण परत केली.  

Exit mobile version