। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिवारात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक याचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. तेथील एका रिक्षाचालकाने रिक्षामध्ये सापडलेला महागडा मोबाईल प्रवाश्याला परत केला आहे.
भिवपुरी रोड स्टेशन येथील डिकसळ भागाकडे असलेल्या रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा चालक मदन हिरे यांनी आपल्या एम एच ४६- ए झेड ६८४४ या क्रमांकाच्या रिक्षामधून कर्जत डिकसळ येथील डायमंड सोसायटी असे भाडे पूर्ण केले होते.त्यावेळी रिक्षा मधून प्रवास करणारा प्रवासी अभिराज महाले यांचा ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये राहिला होता.
त्यानंतर त्या प्रवाशाने आपल्या कडे मोबाईल नसल्याचे पाहून त्या मोबाईल क्रांकवर फोन केला असता रिक्षा चालक हिरे यांनी गाडी मध्ये मोबाईल आहे अशी माहिती दिली. काही तासांनी संबंधित प्रवासी पुन्हा आला असता त्या रिक्षाचालक यांनी प्रामाणिकपणा महागडा मोबाईल कोणतीही अपेक्षा न करता परत केला. सदर रिक्षाचालक हा संजयक कार्य देखील करीत असतो.







