को.म.सा.प.शाखा तळातर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे रविवार, दि 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जागर युवाशक्तीचा उपक्रमांतर्गत लेख व काव्यलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण, बी.ए.एम.एस.पदवीधारक विद्यार्थी सत्कार व सन-2022/23 गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा तळा तालुक्यातील ज्ञानदिप माध्यमिक विद्यामंदिर बोरघर हवेली येथे मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळा शाखा संस्थापक पुरुषोत्तम मुळे असून, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक जिवीता पाटील, को.म.सा.प. जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम, जिल्हा कार्यवाह अजित शेडगे, मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ आदी उपस्थित राहणार आहेत.

गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राथमिक विभागातून रा.जि.प.शाळा बोरघरच्या उपशिक्षिका उमा सदाशिव भोई तर माध्यमिक विभागातून माध्यमिक विद्यालय पढवणचे मुख्याध्यापक बळीराम महादेव चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. तळा शाखा युवाशक्तीतर्फे आनलाईन स्वरुपात घेतलेल्या लेख व काव्य स्पर्धेत विजेते ठरलेले युवक-युवतींचा सत्कार केला जाणार आहे. लेख स्पर्धा विजेते प्रथम- अंकुश जाधव, रोहा, द्वितीय- मुग्धा सागवेकर, महाड, तृतीय-.जान्हवी मासाल-मुरुड तर काव्यलेखन स्पर्धा विजेते प्रथम-पंकज पांडुळे, पनवेल, द्वितीय-मैथीली माळवदे, श्रीवर्धन तृतीय- चेतन बारस्कर यांचाही सन्मान केला जाणार आहे. तळा शाखेच्या सदस्यांचे पाल्य विशाखा भरत जोशी, सिध्दी विलास मांडवकर,विनया कृष्णा कांबळे,शुभम जितेंद्र म्हाञे यांनाही पुष्प,सन्मानचिन्ह व सन्मानपञ देऊन गौरविले जाणार आहे.शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपञ देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व को.म.सा.प.सदस्य, शिक्षक व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन को.म.सा.प.शाखा तळा अध्यक्ष हेमंत बारटक्के,कार्याध्यक्ष संदिप जामकर,उपाध्यक्ष भरत जोशी,सचिव विजय पवार,सहसचिव उल्का माडेकर,खजिनदार आंबेगावे,सल्लागार जितेंद्र म्हात्रे, कल्पना पवार व सर्व सदस्यांनी केले आहे.

Exit mobile version