शेतीच्या बांधावर बळीराजाचा सन्मान

| पाली । वार्ताहर ।
सालाबादप्रमाणे याहीवर्षी रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या सुधागड प्रेस क्लबच्या वतीने दोन प्रयोगशील शेतकर्‍यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी भेरव येथील आदर्श शेतकरी विठ्ठल बाबू सागळे व कानसळ येथील प्रयोगशील शेतकरी तथा सुधागड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन किसन उमटे यांना आदर्श प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. रायगड प्रेसक्लबच्या माध्यमातून दरवर्षी जिल्ह्यातील प्रयोगशील, शेतीनिष्ठ शेतकर्‍यांची आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड केली जाते. निवड झालेल्या शेतकर्‍यांचा शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, विजय तायडे, प्रेस क्लब अध्यक्ष विनोद भोईर, कार्याध्यक्ष रविद्रनाथ ओव्हाळ, परेश शिंदे, निशांत पवार, संदेश उतेकर, परळीचे माजी अमोल देसाई , गायकवाड, उत्तमराव देशमुख , दीपक पवार , मिलिंद गोळे,संजय सागळे, पकन जाधव, विकी पवार अतिश सागळे,आदि मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version