डॉ.प्रकाश पाटील यांचा गौरव

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ.प्रकाश पाटील यांना त्यांनी आत्तापर्यंत टेस्ट ट्युब बेबी संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशिस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले आहे. पनवेलसह रायगड, नवी मुंबई व कोकणातील प्रथम टेस्ट ट्युब बेबीला जन्म देणारे व आत्तापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त जोडप्यांना अपत्य प्राप्ती करून देणारे डॉ.प्रकाश पाटील यांना झी 24 तास हेल्थ अ‍ॅण्ड वेल्थ या नावाने विशेष प्रशिस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.विविध सामाजिक संघटना, संस्थेच्या माध्यमातून गौरविण्यात आले आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवार, डॉक्टर्स असोसिएशन, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कुटुंबियांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. यावेळी झी 24 तासचे निलेश खरे उपस्थित होते.

Exit mobile version