नवरात्रोत्सवानिमित्त नारीशक्तीचा सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
। उरण । वार्ताहर ।
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, कार्य, विचार डोळ्यासमोर ठेऊन विविध समाजपयोगी उपक्रम राबविणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला होता.प्रसिद्धी पासून दूर असलेल्या परंतु समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील एकूण 9 महिला भगिनींना यावेळी गौरविण्यात आले.
महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन ढेरे, आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, आदर्श शिक्षिका सुप्रिया मुंबईकर,रँकर्स अकॅडेमीचे अध्यक्ष प्रतीक मुंबईकर,चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कडू उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्र डॉ नेहा म्हात्रे, शिक्षण क्षेत्र सुनीता पाटील,
अंगणवाडी सेविका -जयश्री तांडेल, स्वच्छता क्षेत्र -गंगाबाई म्हात्रे,साहित्यिक -लेखिका हेमाली म्हात्रे, क्रीडा क्षेत्र अमेघा घरत, न्यायदान क्षेत्र अ‍ॅड वर्षा पाटील, पोलीस प्रशासन -सुप्रिया तांडेल, ट्रॅफिक महिला कर्मचारी -स्वीटी टिके या प्रसिद्धी पासून दूर असलेल्या समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या एकूण नऊ महिलांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्त्री सन्मान पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सुदेश पाटील,विठ्ठल ममताबादे, प्रेम म्हात्रे, ओमकार म्हात्रे, सुरज पवार, नितेश पवार, प्रकाश म्हात्रे, माधव म्हात्रे, संदेश केदारी, हेमंत ठाकूर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमाली म्हात्रे तर आभार प्रदर्शन विठ्ठल ममताबादे यांनी केले.

Exit mobile version