| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बारामती कृषी विकास ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रायगडच्या तपस्वी नंदकुमार गोंधळी यांचा सत्कार केला जाणार आहे. संस्थेच्यावतीने गेली 16 वर्षे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
या वर्षी हा कार्यक्रम सोमवारी (दि.13) साजरा करीत आहेत. या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील उल्लेकनीय कार्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा आंतर राष्ट्रीय खेळाडू तपस्वी यांचा सन्मान ट्रस्टच्या विश्वस्थ सुनंदा पवार बारामती यांच्या हस्ते शारदानगर शैक्षणिक संकुलातील अप्पासाहेब पवार सभागृह येथे होणार आहे.