दिपक मोकल पुरस्काराने सन्मानित

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंड्यातील कोएसो शाळेचे माजी मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक दिपक मोकल यांना नुकतेच प्राईड ऑफ इंडिया अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलासाधना सोशल आरॅगनॉयझेशनच्या वतीने दिपक मोकल यांना राष्ट्रीय पातळीवरील प्राईड ऑॅफ इडिया अवॉर्ड 2023 पुरस्काराने रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी कराडी समाज हॉल, सेक्टर 14 कामोठे, नवी मुंबई येथे अभिनेत्री नयन पवार, झी.टी.व्ही वाहिनीचे संदिप देसाई, विनोदाचे बादशाह जॉनी रावत यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात प्रसिध्दीस असलेले दिपक मोकल यांना आजपर्यंत अष्टगंध पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, आदर्श क्रीडा शिक्षक, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार, राज्यस्तरीय क्रीडारत्न, कुलाबा जीवन गौरव, रायगड जिल्हा आदिवासी संघटना आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version