| पाताळगंगा | प्रतिनिधी |
नुकताच पाल्मिस्ट दिल्ली या नामांकित संस्थेतून पीएचडी पदवीने सन्मानित केलेले डॉ. महेश निमणे यांना पुणे येथे टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित सह्याद्रिरत्न या पुरस्काराने पत्रकार भवन, नवीपेठ पुणे येथे सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ अश्या या पुरस्कारांचे स्वरूप होते. गेले अनेक वर्ष खोपोली येथे सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करीत असून या वास्तू शास्त्राचा हजारो व्यक्तींना उत्तम लाभही झाला. गुढ विज्ञान या क्षेत्रात वास्तुशास्र, अंकशास्त्र, रेकी, लोलक शास्त्र यात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहे. आजवर निमणे यांना खोपोली पद्मश्री पुरस्कार, पुणे उद्योग भूषण, टाइकून्स ऑ़फ महाराष्ट्र, नाशिक, वास्तु श्री पुरस्कार, संभाजी नगर, प्रो पाल्मिस्ट दिल्ली, विद्यास्पति, वृंदावन उत्तर प्रदेश आदि पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. तसेच, त्यांनी केलेले मार्गदर्शन अनेकांसाठी लाभदायक ठरले आहे.







