रमेश धनावडे पुरस्काराने सन्मानित

। नागोठणे । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण पुरस्कार प्राप्त रमेश प्रभाकर धनावडे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणार्‍या मराठी साहित्य मंडळाने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे नुकत्याच झालेल्या एका शानदार कार्यक्रमामध्ये त्यांना साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानपत्र गौरवाने प्रदान करण्यात आले. समाजाची सेवा, समाज उपयोगी कार्याची समाजाला ओळख व त्याद्वारे समाज घटकांना प्रेरणा मिळावी यासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळावी हा पुरस्काराचा हेतू आहे.

Exit mobile version