एकुलत्या एक मुलीसह आईचा सन्मान

। खोपोली । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एकच मुलगी अपत्य असणार्‍या आई आणि मुलीचा यथोचित सन्मान करण्यात आला. मुलगा-मुलगी एक समान असल्याचा संदेश देण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल असा विश्‍वास महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे.

यावेळी अल्प संख्यांक प्रदेश सचिव जैबुनिसा हमीद शेख, सायली डोंगरे, वैशाली भोसले, मीना सुतक, रुक्मिणी भस्मे, रंजना हंडे, शिल्पा घरत, शोभा फाले, यास्मिन शेख,शेहनाज शेख यांच्या महिला आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे म्हणाल्या की, शरद पवार यांनी महिलांना आरक्षण मिळवून दिले, महिलांना न्याय हक्क व स्वतंत्र योजनांचा लाभ मिळण्यासाठी महिला आयोगाची आणि महिला व बालविकास विभागाची स्थापना केली. तसेच, शरद पवार यांना खात्री असल्याने व स्त्रीला संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते असा विश्‍वास असल्याने माझा वारस माझी मुलगीच असेल आणि माझी मुलगीच माझे कार्य पुढे नेईल या विचारातून शरद पवारांनी दुसरे अपत्य होऊ न देता एक मुलगी असल्याचा आदर्श समाजा समोर उभा केला. सुप्रियाताई सुळे यांनीसुद्धा प्रत्येक प्रसंगात शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे राहून आणि आपल्याला मिळालेली जबाबदारी निष्ठेने आणि यशस्वीपणे पार पाडून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा रथ सक्षमपणे पुढे नेला असल्याचे बोलताना सांगितले.

Exit mobile version