। रायगड । प्रतिनिधी ।
रायगडमधील तळोजा एमआयडीसीतील व्ही व्ही एफ इंडिया लिमिटेडमधील कामगार दिलीप गणपत खोंड यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने कामगारमहर्षी ग. द. आंबेकर श्रमगौरव पुरस्कारासह रुपये पस्तीस हजार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शाल श्रीफळ मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व इतर मान्यवर उपस्थितीत होते.






