अॅड.गौतमभाई पाटील प्रीमियर लीग
। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खानावच्या नवतरुण स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावर अॅड. गौतमभाई पाटील प्रीमियर लीग टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील माजी क्रिकेटपटूंचा सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक सामन्याच्या वेळ एका माजी खेळाडूला निमंत्रित करून त्याच्या शुभहस्ते सामन्याचे नाणेफेक करण्यात येते व त्यानंतर त्या खेळाडूचा सन्मान करण्यात येतो.
अलिबाग तालुक्यातील जेएसएम कॉलेज, क्रीडा भवन आणि आपापल्या क्लबकडून लेदर बॉल क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे अशा माजी खेळाडूंचा सन्मान करण्यात येत आहे. यावेळी अरुण पाटील, अरुण तरे, अॅड. भूषण साळवी, जितेन पाटील, ऋषिकेश साखळकर, शैलेश घरत, संजय बने, अॅड. जयेश जोशी, नितीन जैन, अजय टेमकर, भानुदास कोळी, अॅड. राहुल मोरे अशा सर्व माजी खेळाडूंचा सन्मान होत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी अॅड. गौतमभाई पाटील व स्पर्धेचे आयोजक अभिजित तुळपुळे यांचे आभार मानले आहेत.