जगदीश मरागजे यांचा सन्मान

| खोपोली | वार्ताहर |

23 जुलै 1952 साली भारताला पाहिले ऑलम्पिक पदक महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. या दिनाचे औचित्य साधून मान अभिमान विकास फाउंडेशन तथा ऑलिंपिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती यांच्यावतीने सन 2023 या वर्षातील राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ कराड सातारा येथे पार पडला. यावेळी देशातील नामवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

त्यात खालापूर तालुक्यातील जगदिश मरागजे यांना या वर्षीचा ‘खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार 2023’ याने सन्मानित करण्यात आले. कारमेल कोन्व्हेंट स्कूल खोपोली येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत ते एक उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत. या समयी हॉकी इंडियाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षदा ढेकळे, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू स्नेहा जमदाडे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फन्ड, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाल, राष्ट्रीय पंच विक्रम पवळे यासह एकूण 24 पुरस्कार्थींना हिंद केसरी दीनानाथ सिंह, क्रीडा व युवक कल्याण भारत सरकारचे यशवंत नामखेडकर, सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक डॉ. शशिकांत डोईफोडे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त पंढरीनाथ अण्णा पठारे, महाराष्ट्राचा तुफानी मल्ल माऊली जमदाडे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version