खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

| रसायनी । वार्ताहर ।

सामाजिक कार्यातून अग्रेसर असणारे सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर प्रकाश टाकला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्त पत्रकार बांधवांना सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम सम्यक सामाजिक संस्थेच्या रीस येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक-अश्‍वनाथ खेडकर, संदीप मुंढे, कृष्णा पारंगे, सुधीर शिंदे, राकेश खराडे, बाळासाहेब सावर्डे, बाबु पोटे, राहुल जाधव, प्रशांत गोपाळे, अमोल सांगळे, दिनेश पाटील, विकी भालेराव, संदिप ओव्हाळ, समाधान दिसले, प्रतिक चाळके, विश्‍वनाथ गायकवाड, विशाल वाघमारे, दिनकर भुजबळ, गौतम सोनावणे, प्रसाद अटक आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version