| नवी मुंबई | वार्ताहर |
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्या तीन कर्मचार्यांना महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित निरोप समारंभात त्यांच्या सेवेचा गौरव करीत त्यांना सन्मानीत करण्यात आले.
प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्या महिन्यात महानगरपालिका सेवेतून विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणर्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेची परंपरा आहे.
महापालिका आयुक्तराजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले महापालिका कर्मचारी मुख्याध्यापिका रत्नमाला बिरारी, लिपिक-टंकलेखक काशिनाथ सोनटक्के, राजश्री पुरी अशा तीन सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांचा महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रशासन विभागाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात व विलास मलुष्टे आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमुंमपा सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सन्मान
