संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान

। उरण । प्रतिनिधी ।

छ. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणार्‍या महिलांना योग्य मानसन्मान व्हावा. त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा, न्याय मिळावा या अनुषंगाने या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा सन्मान करण्यात येतो. याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून कोप्रोली चौक येथे नवदुर्गांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रीती नायर (सामाजिक क्षेत्र), डॉ. श्‍वेता इंगोले (वैद्यकीय क्षेत्र), सीमा भोईर (पत्रकारिता), सरोज म्हात्रे (बचत गट), सुगंधा म्हात्रे (आशा वर्कर), सुगंधा पाटील (स्वच्छता कर्मचारी), अ‍ॅड. दीपाली गुरव (न्यायदान क्षेत्र), सुनीता वर्तक (शिक्षण क्षेत्र), कनिष्का नाईक (पोलीस प्रशासन) या नवदुर्गांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, विठ्ठल ममताबादे, ओमकार म्हात्रे, प्रेम म्हात्रे, माधव म्हात्रे, अजित म्हात्रे, नितेश पवार, हितेश मोरे, आदित्य पाटील, प्रणित पाटील, सागर घरत, प्रकाश म्हात्रे, सचिन म्हात्रे, शुभम ठाकूर, जयदास म्हात्रे, शरद पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version