पोलीस निरीक्षक वनकोटी यांचा सन्मान

। पेण । प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता देण्यात येणारे केंद्रीय गृहमंत्री पदक मीरा रोडच्या नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना जाहीर करण्यात आला आहे.

त्यांच्या या कामगिरीबाबत पेणसह रायगडमधून जितेंद्र वनकोटी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राज्यातील 11 पोलीस अधिकारी, अंमलदार यांना हे पदक जाहीर झाले आहे. वनकोटी हे मुळचे पेणचे रहिवासी आहेत.

Exit mobile version