| महाड | प्रतिनिधी |
माऊली महिला मंडळ कवे आळी यांनी शनिवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी महिला पोलीस अधिकार्यांचा सत्कार करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. अनेक संकटं व रात्रंदिवस काम करून आपली सेवा बजावत सामान्य जनतेची ती आई भवानीच्या रूपाने रक्षण करते आणि अशा महिला अधिकार्यांचा सत्कार हा आमच्या हस्ते झाला हेच आमच्यासाठी माणिक मोती दुसरं काहीच नाही, अशी भावना मंडळातील महिलांनी व्यक्त केली. दरम्यान, कवे आळी मित्र मंडळातील सेवानिवृत्त कर्मचार्यांकडून मंडळाला लाईफ जॅकेट देण्यात आले.