कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान

19 जणांना पोलीस महासंचालक पदक बहाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 19 पोलीसांचा बुधवारी (दि. 01) महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. अलिबागमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात तीन पोलीस अधिकारी व 16 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक पदकानेे कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान करण्यात आला. रायगड पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, सहा सहाय्यक फौजदार, नऊ पोलीस हवालदार व एक पोलीस नाईक यांचा समावेश आहे.

सेवा कार्यात चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय टेमघरे, सहाय्यक फौजदार प्रकाश अंबिवले, दिपक ठाकूर, शामकांंत पाटील, सुभाष सोनावणे, अनिल सानप, शरद मोरे, पोलीस हवालदार, शशीकांत कासार, प्रदिप झेमसे, राजेंद्र पाटील, यशवंत झेमसे, जगदिश बारे, भानुदास कराळे, वैभव काठे, महिला पोलीस हवालदार उज्वला ठाकूर, जयेश पाटील, पोलीस नाईक जयेंद्र पाटील यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.

यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे सध्या मांडवा सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सहाय्यक फौजदार अनिल सानप हे सध्या अलिबागमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी अलिबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये असताना त्यांनी सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्याला पकडण्यामध्ये योगदान दिले आहे.

Exit mobile version